कामोठे सेक्टर-18 मध्ये सायकल चोरी; सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद.........



कामोठे सेक्टर-18 मध्ये सायकल चोरी; सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद.........


कामोठे सेक्टर-18 परिसरातील ब्लिंकइट दुकानाजवळ आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात मुलाने सायकल चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून, परिसरात चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायकल रस्त्याकाठच्या जागेत उभी असताना आरोपी मुलगा शांतपणे त्या दिशेने आला आणि काही क्षणांत सायकल घेऊन फरार झाला. घटनेनंतर मालक व स्थानिक नागरिकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरी स्पष्टपणे दिसून आली.