🎤🎤सरकार राज
*नवी मुंबईत महापालिकेचा धडाका....*
*आयुक्तांच्या एका आदेशाने आठही विभाग हलले-
*फेरीवाल्यांची उडाली पळापळ,
अतिक्रमणधारकांची धांदल.....*
*नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या कठोर आदेशानंतर आज सकाळी ठीक नऊ वाजता शहरातील आठही विभाग कार्यालयांनी फेरीवाले, अतिक्रमण, मार्जिन स्पेस यांच्यावर अक्षरशः धडाधड कारवाईचा तडाखा देण्यास सुरुवात केली....*
*महापालिकेच्या अॅक्शन मोडने शहरात एकच धुव्वा उडाला फेरीवाल्यांची घाईगडबड
अतिक्रमण करणाऱ्यांची पळापळ
व्यापाऱ्यांचे हातपाय गाळले
रस्त्याच्या कडेला बसलेल्यांची उडाली धांदल
*महापालिका पथकं कुठून येतील याचा थांगपत्ता नसल्यामुळे अनेकांनी स्वतःच जागा रिकामी करून माल गोळा करण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी तर पथक दिसताच दुकानांच्या शटरपासून ते हातगाड्यांपर्यंत सर्वांनी अक्षरशः धावाधाव केली.....*
*शहरात सुरू असलेल्या या धडाकेबाज कारवाईने नवी मुंबईत चर्चांची तापमानपातळी उसळली असून पुढील काही दिवसांत आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे....*
🎤🎤उंगली डॉट कॉम
