घणसोलीतील तरुणांचा चैत्यभूमीवर मानवसेवेचा ठसा – महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोफत भोजनदान
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आलेल्या लाखो अनुयायांच्या सेवेसाठी बुद्धिस्ट युथ ऑफ घणसोली सिटी यांच्या वतीने मोफत भोजनदानाचे आयोजन करण्यात आले. घणसोलीतील तरुणांनी उत्साह, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी दाखवत या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
सकाळपासूनच चैत्यभूमी परिसरात येणाऱ्या भीमसैनिकांना शिस्तबद्ध पद्धतीने भोजन देण्यात आले. अनेक वृद्ध, महिला आणि दूरवरून आलेल्या अनुयायांनी या सेवेचा लाभ घेतला. सेवा, सहकार्य आणि समर्पणाच्या भावनेतून राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी
सचिन कटारे, ऍड. स्वप्निल जगताप, संकेत पवार, नरेंद्र नले, संजय कांबळे, स्मिता नले, सायली झेंडे, कविता कांबळे, सायली गायकवाड, रोशनी डोंगरदिवे, रिया कांबळे, मिनाक्षी ढाणके, विराज कांबळे, स्पंदन कटारे या सर्वांनी समन्वय, नियोजन आणि प्रत्यक्ष कामात महत्त्वाची भूमिका बजावली.
समाजातील एकतेचा आणि सेवा-भावनेचा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम पुढील काळातही सुरू ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.
