26/11 हल्ल्याला 17 वर्षे पूर्ण, कटू आठवणीत लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई तर्फे कँडल मार्च कार्यक्रमाचे आयोजन
नवी मुंबई : 26/11 हा दिवस म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहतो. कारण हा दिवस मुंबईकर काय तर संपूर्ण देशवासीय विसरणार नाही. हा दिवस सर्वांसाठी काळा दिवस आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवसाची आठवणीत लायन हार्ट ग्रुप, नवी मुंबई, प्रियंका प्लांट हाऊस, वेस्टर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड बिझनेस मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने कँडल मार्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पापांचा बळी गेला होता. दशतवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबारात 18 सुरक्षाजवानांसह 166 जणांचा बळी गेला तर शेकडो नागरिक जखमी लेल्यांना कॅन्डल लावून भावपूर्ण श्रद्धांजली वायली तसेच. प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनामध्ये कायम आहेत. 17 वर्षांपूर्वी झालेल्या त्या जखमा आजही ताज्या आहेत. दहशतवाद्यांनी खेळलेली ती रक्तरंजीत होळी कोणीही विसरले नाही. त्या दिवशी अनेकांनी आपल्या जवळचा व्यक्ती गमवला. त्यामुळे या दिवसाच्या आठवणी काढल्या तरी डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. तरी हा कार्यक्रम विश्वेश्वर एज्युकेशन सोसायटीचे वेस्टर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड बिझनेस मॅनेजमेंट, से. ९, सानपाडा, नवी मुंबई यांच्या ऑडिटरम मध्ये झाला या कार्यक्रमाप्रसंगी विरेंद्र यशवंत म्हात्रे लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे संस्थापक, नवी मुंबई भूषण पुरस्कार प्राप्त, हाजी शाहनवाज खान सामाजिक कार्यकर्ते व संस्थापक हाजी शहाणवाज खान फाउंडेशन समाजभुषन श्री. उत्तम तरकसे आसरडोहकर कवी, साहित्यिक विचारवंतमहाराष्ट्र पोलिस दल नवी मुंबई गुन्हे शाखा, विक्की वांडे अभिनेता व मालक प्रियांका प्लांट हाऊस,सहाय्यक प्राध्यापक सह एनएसएस कार्यक्रम अधिकारी बरकाधू निशा, आर. सहायक प्राध्यापकः अभिषेक गुरव, फिटनेस ट्रेनर अब्दुल शेख व लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे कार्यकर्ते व एनएसएस चे विद्यार्थी उपस्थित होते.
