दिन 26/11/2025 आणि 26/11 मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली*


 दिन 26/11/2025 आणि 26/11 मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली* 


 *भारतीय जनता पार्टी, वाशी मंडळ, नवी मुंबई च्यावतीने ७६ वा संविधान दिन आणि 26/11 मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली  कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी, सकाळी 11.30 वाजता भाजपा जनसंपर्क कार्यालय, सेक्टर -9, वाशी येथे करण्यात आले होते*  सर्व प्रथम उपस्थितांनी कार्यालयाबाहेर 2 मिनिटे स्तब्ध उभे राहून 26/11 मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि नंतर कार्यालयामध्ये ७६ वा संविधान दिनानिमित्त छोटेखानी संविधान सभेचे आयोजन करण्यात आले सभेत संविधान उद्देशीकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. विचारपीठावर श्री. विकास सोरटे, श्री.राजु शिंदे, श्री. मंगेश चव्हाण, श्री. विक्रम पराजुली, सौ. सुगंधा शेलटकर यांनी आपले विचार मानले. सदर कार्यक्रमासाठी वाशी मंडळातील मा. नगरसेवक श्री. राजु शिंदे , श्री. विक्रम पराजुली, श्री. मधुकर कोलगे, सौ. प्रमिला खडसे, श्री. रामकृष्णन अय्यर, सौ. कविता कटकधोंड, सौ. सुगंधा शेलटकर, सौ. सुमा रंजिथ, श्री. मंगेश चव्हाण, श्री. प्रताप भोसकर, श्री. भरत मावळे, श्री. गणेश शिंदे, मंदार म्हात्रे हे प्रामुख्याने उपस्थित होते तसेच वाशी मंडळातील सर्व जेष्ठ नेते, जिल्हा - मंडळ आजी माजी पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सौ. सुमा रंजिथ यांनी केले.