छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून श्रेयवाद नको – खासदार नरेश म्हस्के...
नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण गेल्या काही महिन्यांपासून रखडले होते. त्यामुळे शिवभक्त आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. अखेर मनसे नेते अमित ठाकरे यांनी गेल्या रविवारी या पुतळ्याचे अनावरण केले.
याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के यांनी पुनःअनावरणाच्या कार्यक्रमास गैरहजेरी लावत प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे. एकदा पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर तो कार्यक्रम पुन्हा करण्याची गरज राहत नाही. महाराजांच्या नावाचा वापर करून श्रेयवादाची लढाई लढणे चुकीचे आहे. याच कारणास्तव मी आजच्या कार्यक्रमास अनुपस्थित राहिलो.”
म्हस्के यांनी स्पष्ट केले की, महाराजांच्या नावावरून कोणताही राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न होऊ नये आणि त्यांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करणे योग्य नाही.