*
जगातील सर्वात महान ग्रंथ म्हणजे भारताचे संविधान..!* - समाजभूषण उत्तमराव तरकसे
=================
नवी मुंबई :- सानपाडा लायन हार्ड ग्रुपच्या वतीने विश्वेश्वर एज्युकेशन सोसायटीचे वेस्टर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड बिझनेस मॅनेजमेंट सेक्टर ९ सानपाडा नवी मुंबई यांच्या सभागृहात संविधान दिनाचे निमित्ताने *"संविधानाचा जागर*" कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे निमंत्रित प्रमुख अतिथी व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समाजभूषण मा. श्री. उत्तमराव दासू तरकसे आसरडोकर (महाराष्ट्र राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ कवी साहित्यिक व विचारवं) तसेच कार्यक्रमाच्या औचित्य साधून उपस्थित असलेले श्री विकी वांडे (अभिनेता) शहानवाज समाजसेवक अब्दुल शेख (समाजसेवक) श्री अभिषेक गुरव (कार्यक्रमाचे आयोजक) श्री वीरेंद्र म्हात्रे (पत्रकार) सौ निंशा मॅडम (कार्यक्रमाचे आयोजक) कार्यक्रमाच्या विचार मंचावर हजर होते. सदर कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी प्राचार्य उपप्रचार्य प्राध्यापक सहप्रध्यापक व इतर सेवक वर्गासमोर संविधानाचा जागर या विषयावर आपले विचार
*"मांडताना गरीब असो किंवा श्रीमंत सर्वांना जगण्याचा, समानतेचा अधिकार देण्यासोबतच आपले कर्तव्य सांगणारा जगातील सर्वात महान ग्रंथ म्हणजे भारताचे संविधान ..!"*
असे संविधाना प्रति गौर उद्गार करत प्रबोधनात्मक संविधानाचा जागर या कार्यक्रमांतर्गत आपले विचार मांडले तसेच २६/११ च्या मुंबईवरील आंतरराष्ट्रीय दहशतवादी झालेल्या हल्ल्याचा व सदर हल्ले दरम्यान अंदा धुंद केलेल्या गोळीबाराचा निषेध करत त्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व शेकडो निष्पाप बळी गेलेल्या नागरिकांना महाराष्ट्र पोलीस दलाच्या व माझ्या परिवाराच्या वतीने त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली व कार्यक्रम आयोजकाचे उपस्थित प्राचार्य उपप्रचार्य प्राध्यापक व शिक्षण सेवक वर्ग तसेच बहुसंख्य उपस्थित विद्यार्थी वर्गाचे आभार देखील मानले
सौ निशा मॅडम यांनी श्री उत्तमराव तरकसे यांचा शाल श्रीफळ व वृक्षरोप देऊन सन्मान केला अभिषेक गुरव यांनी सर्वांना जाग्यावर उभे राहून संविधानाचे उद्देशिकेचे वाचन करत सविधान प्रति अभिमान बाळगण्याची प्रतिज्ञा घेतली तसेच २६/११ च्या हल्ल्यातील शहीद जवानांना व निष्पाप बळी ठरलेल्या नागरिकांना हुतात्मा दिनाच्या निमित्ताने दोन मिनिटे जाग्यावर स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
