नगरपरिषद निवडणुकीत चक्क महायुतीच्याच कार्यकर्त्यांमध्ये राडे....*

 🎤🎤सरकार राज 

*नगरपरिषद निवडणुकीत चक्क महायुतीच्याच कार्यकर्त्यांमध्ये राडे....*

*नवी मुंबईत याहूनही भीषण संघर्षाचा इशारा दहा टक्के चा पैसा राड्यात उडणार....*

*राज्यातल्या नगरपरिषद निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनीच एकमेकांच्या जिवावर उठून राडा घातल्याच्या घटना समोर आल्या आहेत. स्वतःच्या पक्षातच नियंत्रण सुटल्याने राजकीय घराणेशाहीचा चेहरा पुन्हा एकदा उघडा पडला आहे.....*

*पण खरी भीती आहे ती नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची कारण नवी मुंबईतील अनेक नगरसेवकांनी गेल्या काही वर्षांत त्यांच्या प्रभागातून शंभर कोटींपेक्षा जास्त कामे काढून त्यातील सरळ दहा टक्के ‘मलिदा’ तिजोरीत कोंबून ठेवला आहे.आणि आता निवडणूक जवळ येताच हाच काळा पैसा राडे, दंगल आणि गुंडागिरी पेटवण्यासाठी वापरला जाणार,अशी शहरभर चर्चा.....*

*शिंदे गट आणि भाजपात उघड उघड हाणामाऱ्या....*

*अजित पवार गट आणि शिंदे गट रक्ताचे पाणी करणाऱ्या भांडणात...*

*अजित पवार व भाजप कार्यकर्त्यांत तुफान गदारोळ....*

*नवी मुंबईच्या निवडणुकांमध्ये काय होणार याची कल्पनाच नको!

नवी मुंबई पोलिसांनी आता तरी डोळे उघडून पूर्ण तयारीत राहण्याची वेळ आली आहे.

*कारण यावेळी राडे मोठेच नाही तर धोकादायक होण्याची शक्यता आहे.....*

🎤🎤उंगली डॉट कॉम